
शेगाव : येथून नागझरीकडे जाणाऱ्या रस्त्याने सावली सेवा प्रकल्पाच्या समोर रस्त्यालगत पडलेल्या डांबर मध्ये २ गाई फसून अडकल्या होत्या. दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष त्याकडे गेले. यावेळी काहींनी थांबून फसलेल्या गायींना डांबर मधून बाहेर काढत त्यांचे प्राण वाचविले.