Truck Accident: भरधाव कंटेनर पुलावरून कोसळला; चालक, वाहक गंभीर जखमी
Accident News: जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावजवळील पुलावरून कापसाच्या गाठीने भरलेला कंटेनर कोसळल्याची घटना घडली. चालक आणि वाहक गंभीर जखमी असून वाहनाचे आणि मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जळगाव जामोद : तालुक्यातील सुनगाव - जळगाव रस्त्यावरील हॉटेल सातबारा जवळ कापसाच्या गाठीने भरलेला भरधाव कंटेनर पुलावरून खाली कोसळल्याची घटना ता. १७ जुलै रोजी घडली. यामध्ये चालक व वाहक गंभीर रित्या जखमी झाले आहेत.