गावठी बॉम्बद्वारे जंगली प्राण्यांच्या शिकारीचा प्रकार

धिरज बजाज 
Friday, 30 October 2020

हिवरखेड नजीकच्या मौजा अडगाव शिवारात (ता. 24) ऑक्टोबरला वन्यप्राणी रानटी डुक्करच्या शिकारीच्या उद्देशाने लावलेले जिवंत गावठी बॉम्बसह आरोपी पकडण्यात आले.

हिवरखेड (अकोला) : हिवरखेड नजीकच्या मौजा अडगाव शिवारात (ता. 24) ऑक्टोबरला वन्यप्राणी रानटी डुक्करच्या शिकारीच्या उद्देशाने लावलेले जिवंत गावठी बॉम्बसह आरोपी पकडण्यात आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक वन्यजीव विभाग अकोट यांना गस्ती दरम्यान ठाणेदार हिवरखेड माहितीवरून मौजा अडगाव शिवारात वन्यप्राणी रानटी डुक्करच्या शिकारीच्या उद्देशाने लावलेले जिवंत गावठी बॉम्ब सह आरोपी नामे 1) तेजपालसिंग करतारसिंग जुनी रा. निमखेडी ता. संग्रामपूर जि. बुलढाणा  2) किरपालशिग तुतूसिंग बाबर रा. निमखेडी ता. संग्रामपूर जि. बुलढाणा दोन्ही आरोपीना पकडल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक अकोला वनविभाग अकोलाच्या ताब्यात देण्यात आले. 

त्यानंतर वनविभाग अकोला यांनी वनगुन्हा क्र. 21/2018 (ता. 24) ऑक्टोबर 2020 नूसार भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 कलाम 9, 27, 29, 31, 32, 39, 48, 51नुसार (ता. 25) ऑक्टोबर 2020 ला न्यायालयीन कोठडीत चौकशीमध्ये आरोपी एकूण 24 गावठी जिवंत बॉम्ब हस्तगत केले आणि एक रानटी डुक्कर बॉम्ब खाल्ल्याने मृत झाल्यामुळे पशुधन विकास अधिकारी आडगाव यांच्यामार्फत शवविच्छेदन करून नियमानुसार कारवाही करून आरोपींना न्यायालयात दाखल केले.

वरील सर्व कार्यवाही मा.के. आर. अर्जुन उपवनसंरक्षक अकोला वनविभाग अकोला मा. श्री सुरेश वलोदे सहाय्यक वनरक्षक अकोला (वने) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. एस. एस. सिरसाट वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक अकोला, श्री अजय बावणे वनपरिमंडळ अधिकारी अकोट वर्तुळ व अधिनस्त वन कणकर्मचारी एस. जी. जोंधळे वनरक्षक शहानुर बिट, डी. एस. सुरजूसे वनरक्षक बोर्डी बिट श्री जी. पी. घुळे वनरक्षक वि.से. अकोट वर्तुळ यांनी पार पाडली

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two accused from Hivarkhed were caught hunting wild animals with a rural bomb