एकाच दिवशी अकोल्यात दोन मृत्यू

200417125229-01-coronavirus-cdc-image-super-tease.jpg
200417125229-01-coronavirus-cdc-image-super-tease.jpg
Updated on

अकोला ः अकोल्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. या वाढत्या मृत्यूदराबरोबरच अकोल्यात रुग्णवाढीलाही ब्रेक बसताना दिसत नाही. असे असले तरी आता अनलॉक 1.0 मध्ये सर्वच काही सुरू होत असताना समुह संक्रमण निश्‍चितच होणार याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच शनिवारी पुन्हा दोन मृत्यूसह पुन्हा नवे 30 रुग्ण आढळले.

शनिवारी (ता.6) कोरोना संसर्ग तपासणीचे 108 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 78 अहवाल निगेटिव्ह तर 30 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुपारनंतर 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या आठ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित 18 जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान दुपारी दोन रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या 756 झाली आहे. तर आजअखेर 189 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

पुन्हा 30 नव्या रुग्णाची भर
शनिवारी सकाळी 20 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यात सात महिला व 13 पुरुष आहेत. त्यातील पाच जण सिंधी कॅम्प, पाच जण देवी खदान, काला चबुतरा येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, तर ताज नगर, बालोदे ले आउट, हरिहर पेठ, खदान, लकड गंज माळीपूरा व लेबर कॅम्प येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत. तर सायंकाळी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात चार महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सिंधी कॅम्प येथील दोघे तर उर्वरित गंगानगर जुनेशहर, गुलजार पुरा, सोनटक्के प्लॉट, जेतवननगर खदान, भारती प्लॉट, गणेशनगर, व्यंकटेशनगर, जयहिंद चौक येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.

दोन रुग्णांचा मृत्यू
शनिवारी दुपारी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक जण 70 वर्षीय पुरुष असून, हा रुग्ण गुलजारपुरा येथील रहिवासी आहे. हा रुग्ण 3 मे रोजी दाखल झाला होता. आज उपचार घेतांना मयत झाला. तर अन्य रुग्ण ही 40 वर्षीय महिला असून, ती शरीफ नगर जुने शहर येथील रहिवासी आहे. ही महिला 27 मे रोजी दाखल झाली होती. तिचा आज दुपारून उपचार घेतांना मृत्यू झाला.

कोरोना अपडेट
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-756
मृत्यू -35
आत्महत्या-1
डिस्चार्ज-531
दाखल रुग्ण -189 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com