सैलानी यात्रेसाठी मुंबई येथून आल्या होत्या दोन मुली, ट्रक चालकाने केली जबरदस्ती...नंतर घडले हे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

कल्याण मुंबई येथून दोन अल्पवयीन मुली मार्च महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे यात्रेनिमित्त आल्या होत्या. त्यानंतर अचानक टाळेबंदी लागू करण्यात आली. मुलींकडे घरी जाण्याची व्यवस्था नव्हती. परिणामी मुलींनी अकोल्यातील एक कुटुंबाकडे आश्रय घेतला, नतंर त्या ट्रक चालकाच्या मदतीने मुंबईला जाण्यासाठी निघाल्या. परंतु वाटेतच ट्रक चालकाची नियत खराब झाली. त्याने अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याची घटना अकोला शहरापासून जवळच असलेल्या रिधोरा येथे घडली.

अकोला : कल्याण मुंबई येथून दोन अल्पवयीन मुली मार्च महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे यात्रेनिमित्त आल्या होत्या. त्यानंतर अचानक टाळेबंदी लागू करण्यात आली. मुलींकडे घरी जाण्याची व्यवस्था नव्हती. परिणामी मुलींनी अकोल्यातील एक कुटुंबाकडे आश्रय घेतला, नतंर त्या ट्रक चालकाच्या मदतीने मुंबईला जाण्यासाठी निघाल्या. परंतु वाटेतच ट्रक चालकाची नियत खराब झाली. त्याने अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याची घटना अकोला शहरापासून जवळच असलेल्या रिधोरा येथे घडली. 

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  योगेश जवादे  यांना बाळापूर हायवे रोडवर रिधोरा नजीकच्या पेट्रोलपंपाजवळ अल्पवयीन  मुलीस पळवून नेत असल्याची माहिती २९ मे रोजी  प्राप्त झाली होती. माहिती प्राप्त होताच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  राजू लाडुलकर व नितीन अहिर यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दोन अल्पवयीन  बालिका रडत असल्याचे आढळून आले. मुलींची विचारपूस केल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांना एक ट्रक चालक जबरदस्तीने घेऊन जात आहे.  

अधिक चौकशी अंती माहिती मिळाली की,  त्या मुली कल्याण मुंबई  येथून आपल्या मैत्रीणींसोबत सैलानी यात्रा करून अकोला येथे आल्या होत्या. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळापासून त्या अकोला शहरात  अकोट फैल येथेच एका कुटुंबात राहत होत्या. एका दिवशी मुलीच्या आईने कल्याण वरून मुलींना  आणण्याकरीता एका ट्रक चालकाला 30  हजार रूपये दिले असल्याचे मुलींनी सांगितले. तो ट्रकचालक दारूच्या नशेत होता. ट्रक चालकाने मुलीसोबत अश्लील चाळे केल्यामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा  केल्याने ट्रकचालक तेथून पसार झाला.  त्यानंतर मुलींना  विश्वासात  घेऊन माहिती गोळा केली. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने  संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क करून घटनेची  माहिती देण्यात आली.

जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे, बाल कल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांनी  तात्काळ सूत्रे हलवून दोन्ही अल्पवयीन  मुलींना तात्पुरत्या स्वरूपात बालिकाश्रमामध्ये दाखल केले.  या प्रकरणामध्ये  रिधोराचे पोलिस पाटील  देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सपकाळ तसेच बाळापूर येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिंदे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. सद्यस्थितीत अल्पवयीन बालिकांना आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two girls come from mumbai in sailani the truck driver forced them and then happened this