कोरोनामुळे आणखी दोन महिलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

आणखी पाच रुग्णांची भर ः रुग्णसंख्या हजाराच्या जवळ

अकोला ः अकोल्यात रुग्णसंख्या आता हजाराच्या जवळपास जाऊन पोहचली आहे. अशातच शनिवारी (ता.13) महिलांचा मृत्यू झाला असून, तर आणखी नव्या पाच रुग्‍णांची भर पडली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अकोल्यात शनिवारी सकाळी एकुण 67 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरीत अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी सकाळी प्राप्त अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एक महिला असून पाच पुरुष आहेत. ते रजपुतपुरा, बेलोदे लेआऊट हिंगणारोड, गायत्रीनगर कौलखेडा, हरिहरपेठ व बाळापूर येथील रहिवासी आहेत.

दोन महिलांचा मृत्यू
दरम्यान शनिवारी दोन जणांचा मृत्यू  झाला आहे. दोन्ही मयत महिला असून, त्यातील एक 52 वर्षीय महिला आहे. ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून 10 जून रोजी दाखल झाली होती. तिचा 12 जून रोजी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य महिला ही 80 वर्षीय महिला असून, ही महिला देशपांडे प्लॉट जुनेशहर येथील रहिवासी आहे. ही महिला 8 जून रोजी दाखल झाली होती. आज सकाळी  तिचा मृत्यू झाला.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-978
मयत-46(45+1)
डिस्चार्ज-606
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-326


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more women died of corona