
अकोला : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मदनलाल धिंग्रा चौक परिसरात असलेल्या अंडरपासमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह गुरुवारी (ता. १७ जुलै) सकाळी आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.