विनापरवाना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करू नये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

विनापरवाना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करू नये...

शेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती हद्दीत विनापरवाना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करू नये, असा प्रकार आढळल्यास त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला आहे.

कापुस हंगाम सन २०२१-२२ सुरु झालेला असून, काही बाहेरील तालुक्यातील खाजगी कापूस व्यापारी व शेगाव तालुक्यातील काही व्यापारी बाजार समितीचा परवाना न घेता अवैधपणे परस्पर शेतकरी बांधवांच्या घरुन व आपले खाजगी दुकान थाटुन कापूस शेतीमाल खरेदीचा व्यवहार करीत असल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आलेले आहे. अशा व्यवहारामध्ये शेतकरी बांधवांची फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे अशा व्यापाऱ्यांना शेतकरी बांधवांनी आपला कापूस विक्री न करता समितीचे परवानाधारक कापूस खरेदीदार

हेही वाचा: नागपूर : कोरोना विषाणूची नेत्रदानाला लागली नजर

  • मे. गजानन जिनींग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी, शेगाव

  • मे. भरतीया जिनींग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी, सवर्णा

  • मे. केडीया जिनींग फॅक्टरी, शेगाव

  • मे. विभुम कॉटस्पीन, शेगाव

  • मे. जे.सी.सी. अँग्रो प्रोडक्ट, सवर्णी

  • मे. मणिलाल माणेकजी प्रा.लि. शेगाव इ.

कापुस जिनींग मालकांचे फॅक्टरीमध्ये कापूस विक्रीसाठी आणावा. जे खाजगी कापूस व्यापारी बाजार समितीचा परवाना न घेता परस्पर शेतकऱ्याकडून कापूस खरेदी करतांना समितीचे निदर्शणास आल्यास बाजार समिती मार्फत संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येऊन चुकविलेल्या बाजार फीच्या तीनपट रक्कम संबंधित व्यापाऱ्यांकडुन वसूल करण्यात येईल. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी सजग राहून परस्पर व्यवहार आपले नजरेस आल्यास बाजार समितीला खाली दिलेल्या नंबरवर माहिती देवून सहकार्य करावे.

जेणे करुन कोणत्याही शेतकरी बांधवांची फसवणूक होणार नाही. असे आवाहन बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांनी केले आहे.

माहिती देण्याकरीता संपर्क -अ.ए. शेगोकार, निरीक्षक मो.९४०४५००९९४, ना,पु, मो,८६६८७३८३८१ वि,रा,पुंडकर, सह सचिव ९९२२०६३४३४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

loading image
go to top