esakal | उगवण क्षमता चाचणी झालेल्या बियाण्याचा वापर करा
sakal

बोलून बातमी शोधा

उगवण क्षमता चाचणी झालेल्या बियाण्याचा वापर करा

उगवण क्षमता चाचणी झालेल्या बियाण्याचा वापर करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंगळा (जि.वाशीम) ः खरीप हंगामामध्ये शेतकरी अनेक वेळा स्वतः कडील बियाणे वापरतात. परंतु, सदर बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांची बियाणे उगवण बाबत होणारी फसवणूक टाळता येऊ शकल्याचे मत कृषी सहाय्यक संजय जहागीरदार व रुस्तुम सोनवने यांनी व्यक्त केले. ते मुंगळा येथे खरीप हंगाम पूर्वतयारी म्हणून सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी बियाणे उगवन तपासणी प्रात्याक्षिक कार्यक्रमात बोलत होते.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालेगाव यांच्या वतीने मुंगळा येथे खरीप हंगाम पूर्वतयारी म्हणून सोयाबीन मूग, उडीद, ज्वारी बियाणे उगवन तपासणी प्रात्यक्षिक करण्यात आले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन, तसेच ग्राम स्तरावर हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच शुभांगी वायकर, उपसरपंच नंदकिशोर वनस्कर, शेतकरी प्रवीण वायकर, शुभानंद बेलोकर, नंदकिशोर पाठक, रामभाऊ काटकर, संतोष राउत, बाळू महाजन, पप्पू राजेकर, अनंत बेलोकर आदी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गावोगावी असे प्रशिक्षण आयोजित केले जात आहेत. प्रात्यक्षिक नमुना-माल साठवून ठेवण्यासाठी असलेले पोत्याचे चौकोनी तुकडे करून, ते ओले करून त्यावर शंभर दाणे मोजून ते दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर दहा-दहाच्या रांगेमध्ये ठेवावेत, त्यावर हलकेसे पाणी शिंपडावे व त्याची गुंडाळी करून सावलीत ठेवावे, एक-दोन दिवसानंतर अधून-मधून त्या गोणपाटावर पाणी मारावे, सहा ते सात दिवसानंतर शंभर पैकी ७० बियाणे उगवन झालेले असतील, तर ते बियाणे पेरणी योग्य समजून पेरणीसाठी वापरावे, या बियाणे उगवण क्षमता चाचणीमुळे शेतकऱ्यांचे बियाणे उगवणी बाबत खात्री होते व बियाणे न उगवण्याचा व पेरणी खर्च वाचतो. ज्या बियाण्याची उगवण क्षमता चाचणी झालेली आहे. असे बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून पेरणी केल्यास उगवण क्षमता चांगली होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के निश्चित वाढ होते. शेतकऱ्यांनी कमी खर्चाचे अशी उपाययोजना करून होणारे नुकसान टाळाण्याचे आवाहन कृषी विभागाचे कृषी सहाय्यक संजय जहागीरदार यांनी केले आहे.

--------------------------------------

कृषी विभागाच्या वतीने पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता प्रात्यक्षिक करून दाखवून साधारण किंवा चांगल्या उगवलेल्या बियांची टक्केवारी काढून दाखविण्यात आली, तसेच पेरणी करताना ठराविक खोलीवरच बियाणे टाकावे. प्रमाणकापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

-नंदकिशोर वनस्कर, स्थानिक शेतकरी.

------------------------

शेतकऱ्यांनी पेरणी करताना उगवणीच्या टक्केवारीमध्ये १० टक्‍क्‍यांपर्यंत कमी उगवण असल्यास एकरी ठरवून दिलेल्या बियाण्यापेक्षा १० टक्के जास्त बियाणे वापरावे. परंतु, त्यापेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास असे बियाणे वापरू नये.

-शुभानंद बेलोकर, स्थानिक शेतकरी.

-----------------------

कृषी विभागाच्या वतीने पेरणीपूर्व बियाणांची उगवनशक्ती तपासणी हे मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिके करून दाखविले, त्यामुळे एक नवीन माहिती मिळाली. कृषी विभागाकडून वेळोवेळी अशी माहिती दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

-सतोश राऊत, स्थानिक शेतकरी.

loading image
go to top