

Life Imprisonment for 10 in Kisanrao Hundiwale Murder Case
Sakal
-योगेश फरपट
अकोला: गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला. या बहुचर्चित प्रकरणात श्रीराम गावंडे यांच्यासह दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.