

Akola
esakal
अकोला: मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच अकोल्यासह संपूर्ण विदर्भाला उष्णतेच्या तीव्र झळा बसत आहेत. भारतीय हवामान विभागाने रविवारी (ता. २१ जून) अकोल्यासह विदर्भातील नऊ जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. वाढते तापमान आणि उष्ण वारे यामुळे नागरिकांना दुपारच्या काळात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.