अन् ‘त्या’ कुटुंबीयांसाठी धावून आले गाव; मृताच्या कुटुंबाला दिली चार लाखांची आर्थिक मदत

The villagers have taken an initiative and provided Rs four lakh for the cat family in Dusarbeed village :
The villagers have taken an initiative and provided Rs four lakh for the cat family in Dusarbeed village :

दुसरबीड (बुलडाणा) : संकटात असताना एका व्यक्तीच्या आधारावर काहीच होत नसून, एकजुटीने आतापर्यंत मोठमोठे संकट संपुष्टात आले आहे. त्यामुळेच जे राव नाही करू शकत ते गाव करू शकते, या वाक्प्रचाराप्रमाणे मांजरे कुटुंबीयांसाठी अख्खा गावाने पुढाकार घेत त्यांच्या मदतीसाठी फुल ना फुलाची पाकळी टाकत चार लाख रुपयांची मदत उभी केली.
 
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगारा येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी विश्वंभर श्रावण मांजरे यांचा विजेच्या खांबावर शॉक लागल्याने मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे मांजरे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. विश्‍वंभर मांजरे गावात पाणी सोडायचे काम करायचे. त्यामुळे त्यांचा ऋणानुबंध प्रत्येक कुटुंबाशी जुळला होता. त्यामुळे आपल्याच कुटुंबातील व्यक्ती गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना उपसरपंच भगवानराव उगले यांनी गावकऱ्‍यांना मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गावकर्‍यांनी तब्बल चार लाख रुपये जमा करून ती जमा केलेली रक्कम रविवारी (ता.21) मृतकाच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द केली. 

मलकापूर पांगरा येथे वीस वर्षापासून विश्वंभर मांजरे हे पाणी सोडण्याचे काम करत आले. त्यातच ते उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे-मोठे वीज दुरुस्तीचे कामही करायचे. 16 मार्चला वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी ते विद्युत पोलवर गेले असता त्यामध्ये वीज प्रवाह घेऊन त्यांचा खांबावरच शॉक लागल्याने मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अख्खा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. विश्वंभर मांजरे यांना डॉक्टर या टोपण नावाने ओळखले जात होते. त्यांच्या अपघाती निधनाने गावामध्ये चुली पेटल्या नव्हत्या. मनमिळाऊ स्वभावाच्या माणसाच्या अचानक जाण्याने त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी अंत्यसंस्काराच्या वेळी उपसरपंच भगवानराव उगले यांनी श्रद्धांजली अर्पण करताना गावकर्‍यांना मदतीचे आवाहन केले होते. 

त्यासाठी उपसरपंच भगवानराव उगले, सरपंचपती बंडू उगले, गुलशेर खासाब माजी सरपंच अहेमदयारखा सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद यार खा, रवी वायाळ, हनीफ बागवान, गोपाल टाले ,नामदेव उगले, बबन काकडे ,आशिष बियाणी, पोलिस पाटील पांडुरंग सोनवणे, पत्रकार भगवान साळवे, पत्रकार वसीम शेख, पत्रकार फकिरा पठाण, पवन दाभेरे आदींनी गावात फिरून दोन दिवसांमध्ये तब्बल चार लाख रुपये जमा केले. ती जमा झालेली रक्कम पैकी 2 लाख रुपये मृतकाचे पत्नी लक्ष्मीबाई यांना दिले तर उर्वरित 2 लाख रुपये मृतकाचे वडील श्रावण मांजरे यांना असे एकूण 4 लाख रुपये त्यांच्या घरी जाऊन मृतकाच्या कुटुंबांना आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी गावकर्‍यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल मृताचे नातेवाइकाचे डोळे भरून आले उपस्थित गावकऱ्‍यांचे ही डोळे पाणावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com