esakal | राजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या गाव उपेक्षितच, कारंजा-मानोरा मार्ग वाटसरूंच्या उठला जीवावर
sakal

बोलून बातमी शोधा

Villages that are the turning point of Akola News politics are neglected, The Karanja-Manora route is on the rise

राजकारणाच्या सारीपाटावर निवडून येण्यासाठी मतदारसंघातील सर्वच राजकीय नेते मानोरा रस्त्याची वाट धरतात. मात्र, निवडणुकी दरम्यान सर्वांचे लक्ष केंद्रित असणाऱ्या गावाकडे जाणाऱ्या कारंजा-मानोरा रस्त्याचीच पूर्ती वाट लागली आहे. त्यामुळे, कारंजा बायपास येथून मार्गक्रमण करीत असतानाच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून पाण्याचे डबके साचले असल्याने जणू हा रस्ताच मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांच्या जीवावर उठला आहे.

राजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या गाव उपेक्षितच, कारंजा-मानोरा मार्ग वाटसरूंच्या उठला जीवावर

sakal_logo
By
दीपक पवार

कारंजा-लाड (जि.वाशीम) ः राजकारणाच्या सारीपाटावर निवडून येण्यासाठी मतदारसंघातील सर्वच राजकीय नेते मानोरा रस्त्याची वाट धरतात. मात्र, निवडणुकी दरम्यान सर्वांचे लक्ष केंद्रित असणाऱ्या गावाकडे जाणाऱ्या कारंजा-मानोरा रस्त्याचीच पूर्ती वाट लागली आहे. त्यामुळे, कारंजा बायपास येथून मार्गक्रमण करीत असतानाच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून पाण्याचे डबके साचले असल्याने जणू हा रस्ताच मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांच्या जीवावर उठला आहे.

उखडलेले डांबर, साचलेले पाणी, रस्त्यावर गिट्टीचे खडे, दुभाजकावरील वाढलेली झाडेझुडपे यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. आतापर्यंत या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये, बहुतांश जण अपघाताचे बळी पडले आहेत. तरीही, स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही उपाय योजना होत नाही.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सद्या जिल्हाबंदी कायम आहे. मात्र, जिल्हा अंतर्गत दळणवळण करण्यास तसेच प्रवास करण्यास परवानगी असल्याने कारंजा-मानोरा मार्गावर वाहनांची दररोज ये-जा सुरू असते. कारंजा तालुका ही पंचक्रोशीत मोठी बाजारपेठ असल्याने मानोरा तालुक्यातून व्यापार, शिक्षण, आरोग्य किंवा अन्य काही महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांची रेलचेल असतेच. कारंजा ही जरी मोठी बाजारपेठ आहे.

मात्र, मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून राजकारणात कलाटणी देणारे गाव म्हणून मानोरा तालुका परिचित आहे. मात्र, कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचे नी कोणाला चित करायचे हे चांगल्या प्रकारे ठाऊक असणाऱ्या मानोरा गावाची वाटच आजरोजी सुद्धा उपेक्षित आहे. या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. याला कारण म्हणजे, निवडणुकी दरम्यान विकासाला प्राधान्य न देता पैशाचा चाललेला ‘कुटिरोद्योग’ कारणीभूत आहे, अशी चर्चा सुज्ञ नागरिकांमध्ये आहे.

त्यामुळेच की काय, निवडणुकी दरम्यान मानोरा रस्त्याची वाट धरणारी राजकीय मंडळी या रस्त्याची आजरोजी वाट लागली असताना सुद्धा याचा साधा मागमूस ही घेताना दिसत नसल्याने कारंजा-मानोरा हा रस्ता विकासात्मक धोरणापासून कोसो दूर आहे. सद्या तालुक्यात पाऊस अखंडितपणे सुरू आहे.

त्यामुळे, पावसाच्या पाण्यापुढे निकृष्ट दर्जाच्या डांबराने तग धरला नसल्याने गिट्टी उखळून आली आहे. शिवाय, धोक्याची सूचना देणारे दिशादर्शक तसेच माहिती फलक नसल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालकांना अंदाज येत नाही. यामुळे, या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. यामध्ये, अनेक जण जखमी होऊन अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

ऐन निवडणुकीच्या वेळी सर्वच उमेदवारांचे लक्ष मानोरा या तालुक्याकडे असते. मात्र, या रस्त्यावरील खड्डयांकडे कोणाचे लक्ष निवडून आल्यानंतर नसते या खड्डयांच्या काट्याकडे दुर्लक्ष का? असा, सवाल कारंजा-मानोरा मार्गाकडे ये-जा करणाऱ्या वाटसरूंना भेडसावत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)