विश्वास नागरे पाटलांची बदली, यांना मात्र तारीख पे तारीख

भगवान वानखेडे
Friday, 21 August 2020

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सार्वत्रिक बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या १० ऑगस्टपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संकटाने लांबलेल्या बदल्यांचा मुहूर्त आता गणेशोत्सवानंतरच निघण्याची शक्यता आहे.

अकोला  : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सार्वत्रिक बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या १० ऑगस्टपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संकटाने लांबलेल्या बदल्यांचा मुहूर्त आता गणेशोत्सवानंतरच निघण्याची शक्यता आहे.

नाशीकचे आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या बदलीच्या हालचाली सुरू असल्या तरी अकोला जिल्ह्यात पोलिसांच्या सण उत्सवाच्या काळात बदल्या रखडल्याने कमालीची अस्वस्थता आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

एका विभागात किंवा परीक्षेत्रात आठ किंवा त्यापेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या होणार आहे. दरवर्षी प्रमाणे जिल्ह्यात पंधरा टक्के बदल्या होणार असल्याने त्यात कोणाचा नंबर लागतो याकडे पोलिस विभागाचे लक्ष लागले आहे.

सोयीच्या जागेसाठी अनेकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बदलीसाठी तारीख पे तारीख मिळत असल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या पोलिस महासंचालक कार्यालयातून तर विशेष पोलिस महानिरीक्षकांना एका जिल्ह्यात चार वर्ष कार्यकाळ पूर्ण करणाऱ्याचा अधिकार आहे.

राज्य शासनाने दिलेल्या सुधारित आदेशानुसार ३१ जुलैपर्यंत बदल्या होणे अपेक्षित होते. त्याला नंतर १० ऑगस्पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्याला पुन्हा मुदतवाढ मिळाली असून, पाच सप्टेंबरनंतरच बदल्यांचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे.

कुठे होणार यापेक्षा कधी होणार याचीच अधिक चिंता
विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच परीक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण करणारे व बदलीस पात्र असलेले जिल्ह्यातील १२ अधिकारी आहेत. आतापर्यंत १७ जणांनी बाहेर जिल्ह्यात बदली करण्यासाठी विनंती केली आहे. त्यामुळे आता कोणाची बदली कुठे होणार यापेक्षा कधी बदली होणार याचीच चिंता पोलिस अधिकाऱ्यांना लागली आहे. अनेक पोलिस अधिकारी स्वजिल्ह्यात जाण्यास उत्सुक आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishwas Nagre Patal was replaced, but Akola police were delayed