Successful Farmer : साडेतीन एकरावर २९ लाखांच्या संत्रीचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरल्याने २९ लाखांचे संत्रा उत्पादन
Orange Farming : मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेतकरी उद्धवराव राऊत यांनी साडेतीन एकर जमिनीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २९ लाखांचे संत्रा उत्पादन घेतले.
वनोजा : जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात मोठ्या प्रमाणावर संत्रा फळबाग असून, येथील यशस्वी शेतकरी त्यापासून चांगले उत्पादन घेत आहेत. येथील उद्धवराव राऊत यांनी साडेतीन एकर क्षेत्रावर २९ लाखांचे संत्री उत्पादन घेतले आहे.