

Akola News
esakal
हिवरखेड: जिल्ह्यातील हिवरखेड नजीकच्या वारखेड येथील शेतकरी सुभाष म्हसाये यांच्या शेतात सोमवारी (ता.१३) पहाटे पट्टेदार वाघाने पुन्हा आतंक माजवून दोन पाळीव प्राण्यांची शिकार केली. ज्यामध्ये एक गाय व एक गोरा यांचा समावेश आहे. दोन्ही पाळीव जनावरे शेतकरी सुभाष म्हसाये यांच्या मालकीची होती.