सावधान! पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

अनुप ताले 
Monday, 10 August 2020

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडदीप दिली आहे. मात्र आता पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होऊ लागले असून, पुढील दोन दिवस अकोल्यासह विदर्भात अतिवृष्टीचा इशार हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

अकोला  ः गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडदीप दिली आहे. मात्र आता पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होऊ लागले असून, पुढील दोन दिवस अकोल्यासह विदर्भात अतिवृष्टीचा इशार हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

यावर्षी सुद्धा मॉन्सूनचे आगमन अपेक्षित वेळेत झाले नाही. त्यामुळे वार्षिक सरासरीनुसार यंदा पाऊस पडेल की नाही याची सर्वांना चिंता होती. मात्र आगनानंतर कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने व एक-दोन जोरदार ठोक झाल्याने, पिकांसाठी पोषक पर्जन्यमान झाले. शिवाय जलाशयांमध्येही समाधानकारक जलसाठा निर्माण झाल्याने चिंतेची मळभ कमी झाली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मात्र काही दिवसांपासून पुन्हा उघडदीप दिल्याने व उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली होती. परंतु, रविवारी (ता.९) सकाळपासूनच आर्द्रतेचा टक्का वाढून पावसाचे वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे.

परिसरातील हवेचा दाबही पाऊस पडण्यासाठी पोषक असल्याने, पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

विदर्भासोबत जालना, हिंगोली, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यात संततधार पावसाची शक्यता असून, मेळघाट अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होवू शकते. इतर ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning of heavy rains in Akola district in next two days