

Washim News
esakal
वाशीम: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गचे रुंदीकरण करताना या रस्त्यावरील इंग्रजकालीन वृक्ष कापले जाणार नाहीत हे प्रशासनाचे आश्वासन फोल ठरून महामार्गांवरील वृक्षाची कत्तल सुरू आहे. याला पायबंद घालण्यासाठी वृक्षप्रेमी नागरिक पुढे आले आहेत. या संदर्भात आता सागर कोकास यांनी शुक्रवारी (ता. २७) येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात वृक्षतोडीला मनाई करावी, असा अर्ज दाखल केला आहे.