शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली जलसंपदा मंत्री, पालकमंत्र्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

वाण धरणातील शेतकऱ्यांचे सिंचनाकरिता पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेचे व्यतिरिक्त फक्त २० द.ल.घ.मी. पाणी धरणामध्ये शिल्लक राहते. त्यामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहचत असून, सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तेल्हारा (अकोला) : तालुक्यातील वान धरणातील पाण्याची आधीच अनेक योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उचल झालेली आहे व आता अमृत योजना अकोला २४ द.ल. घ.मी. व बाळापूरच्या योजनेसाठी ३.३५ द.ल. घ.मी. पाणी आरक्षित करण्याचा आदेश शासनाने काढला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा व धरणातील पाणी तालुक्यातील शेतीचे सिंचनासाठी आरक्षित करण्यात यावे, या मागणीसाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने बुधवार, (ता. १६) डिसेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. या भागातील शेतकऱ्यांवर कसा अन्याय होत आहे याबाबत आपली बाजू मांडली असता त्यांनी शेतकऱ्यांचे सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा ; नगरसेवकांची धक्काबुक्की, अधिकाऱ्यांचे बहिर्गमण

वाण धरणातील शेतकऱ्यांचे सिंचनाकरिता पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेचे व्यतिरिक्त फक्त २० द.ल.घ.मी. पाणी धरणामध्ये शिल्लक राहते. त्यामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहचत असून, सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वान पाणी बचाव संघर्ष समितीने (ता.०३) जानेवारीपासून वान धरणावर बेमुदत आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. जलसंपदामंत्री जयंतराव पाटील अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या सदर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. सिंचनाबाबत या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे सांगितले. यावेळी तेल्हारा तालुक्यातील १५ ते २० शेतकऱ्यांचे शिष्टमंडल उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Resources Minister Jayantrao Patil and Guardian Minister Bachchu Kadu have promised to solve the problem of forest water in Telhara taluka