बाळापूर (जि. अकोला) - तालुक्यातील कवठा येथे पाणीटंचाईची समस्या पाचवीला पुजली आहे. सरकार कोणाचेही असो; मात्र येथील पाणीसमस्या ‘जैसे थे’ आहे. ‘आमच्याकडे पाण्याचे लय हाल आहेत. नदीपात्रात खड्डे खोदून पाणी आणावे लागते. पाणीटंचाईमुळे मुलांना कोणी मुलगी देत नाही. पोरं तशीच आहेत बिनलग्नाची. कवठा येथील महिलांनी ‘सकाळ’ प्रतिनिधीसोबत बोलताना आपबिती कथन केली.