esakal | पाईपलाईन जोडणीच्या कामामुळे पाणी पुरवठा राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply will be cut off due to Akola Marathi News pipeline connection work

 शहरात अमृत योजनेअंतर्गत विठ्ठल हॉस्पिटल समोर उमरी रोड वर पाईप लाईन जोडणीचे कामासाठी महाजणी प्लॉट येथील जलकुंभवरून होणारा पाणीपुरवठा रविवार (ता.३) ते मंगळवार (ता. ३) पर्यंत बंद राहिल.

पाईपलाईन जोडणीच्या कामामुळे पाणी पुरवठा राहणार बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : शहरात अमृत योजनेअंतर्गत विठ्ठल हॉस्पिटल समोर उमरी रोड वर पाईप लाईन जोडणीचे कामासाठी महाजणी प्लॉट येथील जलकुंभवरून होणारा पाणीपुरवठा रविवार (ता.३) ते मंगळवार (ता. ३) पर्यंत बंद राहिल.

त्यामुळे निबंधे प्लॉट, राहुल नगर, मछिंद्रानगर, उत्तरा कॉलोनी, ज्योती नगर, सातव चौक, शंकर नगर, प्रसाद कॉलोनी, गुप्ते मार्ग, जठारपेठ संपूर्ण, लहान उमरी संपूर्ण परिसर, विठ्ठल फैल, गजानन पेठ, राऊत वाडी, अष्ठविनायक नगर, माणिक टॉकीज, दीपक चौक, माता नगर, टिळक रोड, जनता नगर, न्यू रिगल टॉकीज, दगडीपूल परिसर, लक्कडगंज, मोठी उमरीचा पुढील भाग- भागीरथी नगर, हातेकर वाडी, विठ्ठल नगर, सरोदे ले-आऊट, जुन्या ग्रामपंचायत कडील भाग, ओळंबे ले-आऊट, इंजिनिअर कॉलोनी व फत्तेपूरवाडी इत्यादी भागात ३ ते ५ जानेवारीपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्‍यावर पाणी पुरवठा सुरळीत करण्‍यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image