लागवडीचा खर्चही निघाला नाही: लाखो रुपयांचा माल गेला वाया

लागवडीचा खर्चही निघाला नाही: लाखो रुपयांचा माल गेला वाया

राहेर (ता.पातूर) ः गत वर्षापासून सर्वत्र कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. कोरोना महामारीच्या या जैवीक युद्धात कीती तरी लोकांना आपलं जीवन संपवावं लागलय. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाला थांबवता यावं या हेतूने लॉकडाउनचा प्रयोग केला जातोय. याचा कृषी क्षेत्रावर दुरगामी परीणाम झाल्याचं सत्य असून, तालुक्यात इतर शेती व्यवसाया सोबतच टरबूज या हंगामी शेतीला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. (Watermelon cultivation in Akola district hit by lockdown)

लागवडीचा खर्चही निघाला नाही: लाखो रुपयांचा माल गेला वाया
18 वर्षावरील लाभार्थ्यांना दुसरा डोस उद्यापासून


पातुर तालुक्यातील लॉकडाउनमुळे टरबूज खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागले. तालुक्यातील राहेर अडगाव या गावातील शेतकरी दरवर्षी शेतात विविध प्रयोग करून काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. इथल्या काही शेतकऱ्यांनी वेगवेळ्या तब्बल आठ एकर क्षेत्रावर यावर्षी टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय. पिकांची संगोपणा करत नऊ लाख रुपये खर्चही केला. मात्र ऐनवेळी लागलेल्या लॉकडाउनमुळे उत्पादित झालेल्या मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळाली नसल्याने लागवडीसाठी लागलेला लाखो रुपयाचा खर्च व्यर्थ गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

लागवडीचा खर्चही निघाला नाही: लाखो रुपयांचा माल गेला वाया
खरीप तोंडावर अन् बियाण्याची शोधाशोध!

शेतकऱ्यांना दरवर्षी टरबूज शेतीतून बऱ्यापैकी आर्थिक फायदा होतो. परंतु यावर्षी विक्री न झाल्याने संपूर्ण शेतीलील टरबूजाचे पिकच वाया गेले आहे. परिणामी शेतीला लागलेला खर्च सुद्धा निघाला नसल्यामुळे खरीपाची पेरणीपूर्व मशागत व पेरणी कशी करावी हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. झालेल्या नुकसानी बाबत शासनाकडून मतदीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

लागवडीचा खर्चही निघाला नाही: लाखो रुपयांचा माल गेला वाया
५० गाई फुलवतात १०० एक्कर शेती, दरवर्षी होतंय लाखोंचं उत्पन्न


मी थेट टरबूज व खरबूज रोपे मागवून त्याची ४ एकर शेतीत लागवड केली त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च झाला, परंतु लॉकडाऊन मुळे बाजारात टरबूज व खरबूज या फळांना मागणी नसल्याने प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.
-अनिकेत पाचपोर
टरबूज उत्पादक शेतकरी,अडगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com