

Western Vidarbha Crop Damage
esakal
अकोला : पावसातील खंडामुळे पश्चिम विदर्भातील खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी (ता. २०) अकोल्यात दिली.