esakal | लॉकडाउनचा फायदा किती?, महिनाभरात १४ हजार रुग्ण, ५४४ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनचा फायदा किती?, महिनाभरात १४ हजार रुग्ण, ५४४ जणांचा मृत्यू

लॉकडाउनचा फायदा किती?, महिनाभरात १४ हजार रुग्ण, ५४४ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला ः राज्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये (Corona outbreak in the state) घट होत असली तरी अकोला जिल्ह्यात (Corona in Akola district) मात्र महिनाभरात १४ हजार ९७ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ५४४ जणांचा मृत्यू झाल्याने अकोला अद्यापही रेड झोनमध्ये (Akola In Red Zone) कायम आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यात ता. १ जूननंतर टाळेबंदी शिथिल होत असताना अकोल्यातील प्रतिबंध मात्र कायमच राहण्याची शक्यता आहे. (What is the benefit of lockdown in Akola ?, 14,000 patients, 544 deaths in a month)

मार्च २०२१ पासून जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वेग पकडला. रुग्ण संख्येचा ग्राफ चढत राहिला. त्यात मे महिन्यातील गत २५ दिवसांत जिल्ह्यात एकूण १४ हजार ९७ काेराेना बाधित रुग्ण आढळून आले. त्यातील ५४४ जणांना मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशाससाने मे महिनाच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केलेली टाळेबंदी ता. १ जूननंतरही कायम राहण्याची शक्यत आहे.

हेही वाचा: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची कार पेटवून देण्याचा प्रयत्न

लॉकडाउन

लॉकडाउन

टाळेबंदीचा फायदा किती?

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतरही रुग्ण संख्येत फारसा फरक पडलेला नाही. गत दोन दिवसांतील संख्या दिलासा देणारी असली तरी मृत्यूचे प्रमाण कायम आहे. त्यात अकोल्याचा रिकव्हरी रेट ९० च्या खाली आहे. त्यामुळे टाळेबंदीचा फायदा किती, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. टाळेबंदी लागू झाल्यानंतरच्या पाच दिवसात अर्थात १० ते १४ मेच्या दरम्यान वाढलेली रुग्ण संख्या व मृत्यू हे टाळेबंदीच्या अपयशाचे प्रमाण आहे.

संपादन - विवेक मेतर

What is the benefit of lockdown in Akola ?, 14,000 patients, 544 deaths in a month

हेही वाचा: जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव