Mahabeej Seeds Complaint
sakal
अकोला - गुणवत्तापूर्ण आणि विश्वासाचे प्रमाण सांगूण शेतकऱ्यांना बियाणे विक्री करणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महाबीजद्वारे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण बियाण्यांवर आक्षेप घेत जिल्हाभरातून २५५ तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नोंदविल्या आहेत. त्यापैकी १३४ तक्रारी तालुका स्तरीय समितींद्वारे दिलेल्या अहवालानुसार सदोष आढळल्या असून, १२१ ठिकाणी दुबार पेरणी आढळ्याने शहानिशा होऊ शकली नसल्याचे कृषी विभागाद्वारे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाकडून या सर्व तक्रारींची चौकशी सुद्धा सध्या सुरू असल्याचे समजते.