

बाळापूर - अकोला जिल्ह्यातील बाळापूर परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध घरमालकाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने विवाहास नकार दिल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.