esakal | विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह,आत्महत्या की, खून?

बोलून बातमी शोधा

विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह,आत्महत्या की, खून?

विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह,आत्महत्या की, खून?

sakal_logo
By
सकाळ वृृत्तसेवा

मानोरा (जि.वाशीम) ः स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फुलउमरी येथील प्रकाश राठोड यांच्या शेतातील विहिरीत तुळसीबाई मधुकर चव्हाण (वय ४५) यांचे प्रेत आढळल्याने आत्महत्या की, खून याबाबत गावात तर्क-वितर्क सुरू आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मानोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फुलउमरी येथे तुळसीबाई मधुकर चव्हाण ह्या गेल्या तीन-चार वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. तिची प्रकृती बरी नसल्यामुळे ती दिग्रस येथून दवाखान्यात उपचार करून आल्याचे कळते.

गेल्या तीन-चार दिवसाआधी प्रकाश उदेसिंह राठोड यांच्या शेतातील विहिरीत पडल्याची चर्चा आहे. सोमवारी (ता.१९) तुळसाबाई चव्हाण यांचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मानोरा पोलिसांना कळताच, ठाणेदार जी.टी. धनधार यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतकाचे पती मधुकर पंडित चव्हाण यांनी मानोरा पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन, सदर महिलेचे शव बाहेर काढून शवविच्छेदनकरिता मानोरा येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मानोरा पोलिस करीत आहेत.

संपादन - विवेक मेतकर