esakal | क्रीडा संकुलाचे काम लागणार मार्गी, 15 दिवसाच्या आत काम होणार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

The work of government sports complex in Malegaon taluka will start within 15 days.jpg

सध्या क्रिडा संकुल आहे, परंतु  कुंपणभिंत नसल्यामुळे  त्या ठिकाणी गवत वाढले आहे.

क्रीडा संकुलाचे काम लागणार मार्गी, 15 दिवसाच्या आत काम होणार सुरु

sakal_logo
By
चंद्रकांत उपलवार

मालेगाव (अकोला) : तालुक्यातील शासकीय क्रीडा संकुल खेळण्यायोग्य नसल्यामुळे युवकांचा शारीरिक विकासाला आणि क्रिडात्मक प्रगतीला खिळ बसला  आहे. क्रिडांगणा अभावी तरुणाई जागा शोधत आहेत. खेळण्यासाठी योग्य जागा नसल्यामुळे क्रीडा प्रेमीत तीव्र नाराजी पसरली आहे. लवकरात लवकर हे क्रिडा संकुल सुरू करावे, अशी मागणी ते करीत आहेत. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेतली गेली असल्याने आता लवकरच क्रिडा संकुलनाचे रखडलेले काम मार्गी लागणार आहे.

सध्या पोलिस भरतीचा सराव मुले करित आहेत. तर आरोग्याबद्दल जागृत असणारे लोक दररोज सकाळी आणि सायंकाळी चालणे, धावणे आदी व्यायाम करित आहेत. तर दुसरीकडे कुठेच खेळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने मुलांच्या शैक्षणिक विकासासोबत आवश्यक असणारा शारिरीक विकाससुद्धा खुंटला आहे. त्यांचा मानसिक विकास खुंटून, युवा पिढी रोगराईला आमंत्रण देत आहेत. तीन वर्षांपूर्वी शासकीय क्रिडा संकुल निर्मितीसंदर्भात प्रशासनाकडून  प्रयत्न केले गेले. मात्र अर्धावट काम करून ते थांबले होते. 

सध्या क्रिडा संकुल आहे, परंतु  कुंपणभिंत नसल्यामुळे  त्या ठिकाणी गवत वाढले आहे. तेथे रनिंग ट्रॅक यासह आदी अनेक बाबी अपूर्ण आहेत. अजूनही तेथे सराव करता येत नाही. आवारात अनेक ठिकाणी मोठे गवत सुद्धा वाढले आहे. खेळाडू ते पाहून नाराजी व्यक्त करतात. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे क्रीडा संकुल धूळखात पडून आहे. अद्यापही ते सुरू झाले नाही. युवकांची गरजओळखून काही ले आउट धारक त्यांच्या ले आउटमध्ये मुलांना सराव करू देतात. परंतु तालुका क्रीडा संकुल कार्यान्वित झाले तर मुलांच्या खेळण्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ही सुटणार आहे.  

आता  हिवाळा सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक लोक  सकाळ आणि सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. काही तरूण सकाळी धावण्यासाठी   व  चालण्यासाठी रस्त्यावर दिसत आहेत. परंतु रहदारीमुळे त्यांना जीव मुठीत धरून धावावे लागते. तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी याकडे लक्ष दिल्यास हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणार आहे.

वाशिमचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उपलवार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगण बंद होते. आता यातील छोटी मोठी कामे 15 दिवसाच्या आत सुरू करून हे क्रीडा संकुल खेळण्यासाठी सुरू करण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. 
       
मालेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता डी.सि.खारोळे म्हणाले, एक वर्षांपूर्वी अर्धवट काम करून त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती.
     
संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top