अरे वा...978 पैकी 606 जण कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

326 जणांवर उपचार सुरू ः मृत्यूदराने वाढविली चिंता 

अकोला ः अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत मागील काही दिवसांपासून डिस्चार्ज देण्याची गतीही वेग धरत आहे. आतापर्यंत 978 जणांपैकी तब्बल 326 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. असे जरी असले तरी एका आत्महत्येसह 45 जणांचा मात्र, कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

अकोल्यात येथे 7 एप्रिल रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर मे महिन्यांत ही संख्या झपाट्याने वाढत गेली. आता अकोल्यात एकुण 978 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. ही संख्या जरी मोठी वाटत असले तरी मात्र, यामधील तब्बल 606 जणांनी आतापर्यंत कोरोनाशी लढा देऊन विजय मिळविला आहे. तेव्हा अकोल्यात वाढत्या रुग्णसंख्येसोबतच कोरोनामुक्त होण्याची संख्याही चांगलीच आहे. 

शेवटच्या क्षणांला येणारे दगावले 
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात मृत्यूदर वाढल्याचे बोलले जात आहे. मात्र, मृत्यू झालेल्या अनेक जणांपैकी बहुतांश रुग्ण शेवटच्या स्टेपला रुग्णालयात पोहोचले असल्याने त्यांच्यावर उपचार करणे अवघड झाले. मात्र असे जरी असले तरी आतापर्यंत सहाशेहून अधिक जणांना योग्य ते उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

उपचारासाठी वेळ दवडू नका 
आपल्याला कोरोना आजाराचे कुठलेही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ सर्वोपचार रुग्णालय गाठून उपचार घ्यावा असे आव्हान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडून करण्यात आले आहे. तपासणीसाठी कोणतीही भीती बाळगू नये उशीर झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wow ... out of 978, 606 are corona free

Tags
टॉपिकस
Topic Tags: