
दारव्हा : किराणा व्यावसायिकाच्या घरी भरदिवसा दुपारी एक वाजता दरोडा टाकण्यात आला. बंदुकीचा धाक दाखवून घरातील महिलांचे हातपाय बांधून २५ तोळे सोने, २ किलो चांदी, तसेच नगदी ४ लाख रुपये लंपास केले. शहरात खळबळ उडवणारी ही घटना मंगळवारी (ता. २५) शहरातील अत्यंत गजबजलेल्या राम मंदिर परिसरात घडली. घटनेनंतर केवळ तीन तासांत सहा दरोडेखोरांना शेंबाळपिंप्री (ता. पुसद) येथे अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.