Yavatmal Farmer Tragidy: दोन वर्षांपूर्वी दोन मुलांनी स्वतःचा जीव घेतला, आता शेतकरी वडिलानेही संपविले जीवन

Farmer Found Dead in Yavatmal's Ralegaon: यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे आर्थिक अडचणी, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि प्रलंबित वीजजोडणीच्या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Yavatmal Farmer Tragidy

Yavatmal Farmer Tragidy

esakal

Updated on

राळेगाव (जि. यवतमाळ): जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतानाच राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. सततची नापिकी, वाढते कर्ज आणि शेतीसाठी आवश्यक वीजजोडणी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या ज्ञानेश्वर मालेकर (वय ६२) यांनी गुरुवारी (ता. २३) पहाटे सुमारे पाच वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर मालेकर यांनी आपल्या पाच एकर शेतीसाठी लाखो रुपये खर्च करून बोअरवेल खोदली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com