shaikh hasnain kureshi
sakal
बाळापूर - वादळी वारा आणि पावसामुळे वीटा व मातीच्या घराची भिंत अंगावर कोसळून आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे, रविवारी (ता. २६) दुपारच्या सुमारास घडली. शेख हसनैन शेख बिस्मिल्लाह कुरेशी असे चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे हातरुण गावात शोककळा पसरली आहे.