युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Young farmer commits suicide due to rising debt akot

युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अकोट : वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून २८ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.१०) सकाळी दहा वाजताच्या सुमारास तालुक्यातील उमरा येथे घडली. मोहन हरिदास इंगळे (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. इंगळे याने दोन एकर शेतात कांद्याचे पीक घेतले होते. परंतु, यंदा कांद्याचे उत्पादन घटले आणि बाजार भाव मिळत नसल्याने तो हताश झाला होता.

पीक घेण्यासाठी बँकेकडून घेतल्या पीक कर्जाची परतफेड उसनवारी पैसे घेऊन केली. उसनवारीचे पैसे कसे परत करावे याच चिंतेत मोहनने ता. १० मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्‍चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. घडनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बीट जमदार संजय बोरोडे, मनोज कोल्हटकर, वामन मिसाळ, रवींद्र आठवले यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

Web Title: Young Farmer Commits Suicide Due To Rising Debt Akot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top