Electric Shock: शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
Farm Accident: चांडोळ येथे विहिरीजवळ पंप सुरु करताना विजेचा धक्का बसून शेख फेरोज समद या युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चांडोळ : नियमितपणे आपल्या शेतातील कामे करत असताना शेख फेरोज समद (वय ४२) या शेतकऱ्याला विद्युत पंपाजवळ विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता.१९) रोजी दुपारच्या सुमारास घडली.