akshay nagalkar
sakal
अकोला - बेपत्ता झालेल्या अक्षय विनायक नागलकर (वय-२६, रा. मारोती नगर, बाळापूर रोड, अकोला) याच्या मिसींग प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. जुन्या वादातून रचलेल्या कटात अक्षयचा खून करून मृतदेह शेतातील टिनाच्या शेडमध्ये अत्यंत क्रूरपणे जाळण्यात आला असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी मुख्य आरोपीसह चार जणांना बेड्या ठोकल्या असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.