

मेहकर : पोलिसांची दिशाभूल करत पोलिस दलास वेठीस धरण्याच्या उद्देशाने शहरातील एका युवकाने आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीचा ११२ क्रमांक डायल करून विविध प्रकारची खोटी माहिती दिल्याचा प्रकार १० डिसेंबरच्या रात्री साडेअकरा वाजता घडला. अखेर पोलिसांनी त्या कॉलर युवकावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले.