तुमचा निगेटिव्ह अहवाल आमच्यासाठी ठरतोय पॉझिटिव्हीटी,  आतापर्यंत १३ कोरोना फायटर्स झाले कोरोना बाधित

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 18 June 2020

कोरोना फायटर्स म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे योगदान समाजातील प्रत्येक घटकासाठी महत्वपूर्ण आहे. याच कोरोना फायटर्स वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. असे जरी असले तरी अकोल्यात आतापर्यंत १८६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले असून, आतापर्यंत १३ जणांना कोरोनाने ग्रासले होते. त्यातील आठ जण बरे झाले असले तरी ‘तुमच्या निगेटिव्ह अहवाल आमच्यासाठी पॉझिटिव्हीटी ठरत आहेत असे म्हणणे गैर ठरणार नाही.

अकोला ः कोरोना फायटर्स म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे योगदान समाजातील प्रत्येक घटकासाठी महत्वपूर्ण आहे. याच कोरोना फायटर्स वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. असे जरी असले तरी अकोल्यात आतापर्यंत १८६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले असून, आतापर्यंत १३ जणांना कोरोनाने ग्रासले होते. त्यातील आठ जण बरे झाले असले तरी ‘तुमच्या निगेटिव्ह अहवाल आमच्यासाठी पॉझिटिव्हीटी ठरत आहेत असे म्हणणे गैर ठरणार नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ७६४१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७३२२, फेरतपासणीचे १३३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७६३१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ६५३९ आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल १०९२ आहेत. यामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार किंवा त्या परिसरातील साफसफाई करणारे एकुण १८६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत स्वॅब घेण्यात आले आहेत. यामध्ये आतापर्यंत १३ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर त्यातील ८ जण कोरोनामुक्त झाले असून, ५ जणांवर उपचार सुरू आहेत.

लक्षणं नसणाऱ्या रुग्णांपासून संसर्गाचा धोका कमी
‘आयसीएमआर’च्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, कोरोनाची लक्षणं नसणाऱ्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचे संक्रमण होत नाही. परंतु, काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते अशा रुग्णांच्या थेट संपर्कातून कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा अशांपासून सावध राहण्याचे आव्हान असतेच तरीही आमची सेवा तर देणारच आहोत अशा भावना कोरोना फायटर्संनी बोलून दाखविल्या.

डॉक्टर म्हणतात हे कराच
बाहेर निघणे टाळा
मास्कचा वापर करा
वारंवार हात धुवा
नाका, तोंडाला हात लावणे टाळा
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
क - जीवनसत्व असलेने अन्न सेवन करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Your negative report is positive for us, so far 13 corona fighters have been infected with corona akola marathi news