esakal | पत्नीने पोलिसात तक्रार केली म्हणून बळेगांव येथील रमेश ठोकळने घेतली राहत्या घरात फाशी
sakal

बोलून बातमी शोधा

akola

सदर युवकांच्या पत्नीने अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली होती.

पत्नीने पोलिसात तक्रार केली म्हणून बळेगांव येथील रमेश ठोकळने घेतली राहत्या घरात फाशी

sakal_logo
By
राजकुमार वानखडे

वणी वारुळा (अकोला) : येथील जवळच असलेल्या बळेगांव येथील रहिवाशी असलेल्या रमेश रामदास ठोकळ या ३४ वर्षीय नव युवकाने आपल्या राहत्या घरात दरवाजा आतमधून बंद करून दरवाज्यामागे फाशी घेतली आहे. 

सदर युवकांच्या पत्नीने अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीमध्ये आपले व आपल्या नातेवाईकांना नाहक त्रास होऊन समाजात बदनामी होईल, अशा भितीपोटी रमेश ठोकळ ने नऊ आक्टोबरच्या रात्री उशिरा आपल्या राहत्या घरात फाशी घेवून आपली जीवन यात्रा संपवली. रमेश ठोकळला दोन मुले, भाऊ, आई वडील, बहिण, जावाई असा बराच मोठा गोतावळा आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले