Crime News : अकोल्यातील मस्तानी चौकात मोठ्याने हॉर्न वाजवल्याच्या वादातून एका युवकाची चाकूने हत्या करण्यात आली. या घटनेत दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अकोला : फक्त मोठ्याने हॉर्न वाजवल्याचा आक्षेप घेतल्याने सुरू झालेला किरकोळ वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला. अकोट फैलातील गजबजलेल्या मस्तानी चौकात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.