esakal | किनगावराजा ते दुसरबीड मार्गावर झाडाखाली झोपलेल्या युवकाला चिरडले
sakal

बोलून बातमी शोधा

A youth was crushed by a truck while sleeping under a tree on Kingavaraja to Dusarbeed road on Thursday.

यामध्ये युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. किनगावराजा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला.

किनगावराजा ते दुसरबीड मार्गावर झाडाखाली झोपलेल्या युवकाला चिरडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किनगावराजा (बुलढाणा) : झाडाखाली झोपलेल्या युवकाला ट्रकने चिरडल्याची घटना 14 जानेवारीला किनगावराजा ते दुसरबीड मार्गावर घडली. माधव नारायण झोरे असे मृतकाचे नाव आहे. माधव झोरे हा 14 जानेवारीला दुपारी शेतातील झाडाखाली झोपलेला होता.

यावेळी एमएच 05 एएम 4477 च्या चालकाने ट्रक मागे घेत युवकाच्या अंगावरून नेला. यामध्ये युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. किनगावराजा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृतक माधव नारायण झोरे  यांच्या पश्‍चात पत्नी, दोन लहान मुले व आप्त परिवार आहे.