अहिल्यानगर

Maratha Reservation Survey:नगरमध्ये ३७ हजार कुटूंबांचे सर्वेक्षण; सुटीच्या दिवशीही काम सुरू

शहरात तब्बल ३७ हजार कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. महापालिकेचे ८९८ कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करीत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Maratha Reservation Survey: शहरात तब्बल ३७ हजार कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. महापालिकेचे ८९८ कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. ३१ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. त्यासाठी नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील मराठा कुटूंबांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाने दिले आहेत. शहरात महापालिका स्तरावर या सर्वेक्षणाच्या कामास गती देण्यात आली आहे. सर्वेक्षण करण्यासाठी ८९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. हे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करीत आहेत.

लवकरात लवकर सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाला सादर करण्यात येणार आहे. सुरूवातीला या कामात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही अल्पशिक्षित कर्मचारी या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यांना हे काम येत नसल्याने त्यांच्या जागी नव्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

कुटूंबांची माहिती घेऊन ती ॲपवर अपलोड करण्यासाठी जास्तीचा वेळ लागत आहे. त्यामुळे या कामास विलंब होण्याची शक्यता आहे. परंतु नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांना सहकार्य करावे, त्यांना योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त डॉ. जावळे यांनी केले आहे.

मागासलेपण तपासणार

मराठा कुटूंबांच्या सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूटने ॲप तयार केले आहे. त्यातील प्रश्नावलीनुसार समाजाचे मागासलेपण तपासण्यात येणार आहे. मराठा समाजाची अर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक, कौटूंबिक स्वरूपाची विस्तृत माहिती संकलित करून राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर केला जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT