Ahmednagar shrigonda loksabha election Rajendra Nagwade
Ahmednagar shrigonda loksabha election Rajendra Nagwade sakal
अहमदनगर

अहमदनगर : आमदार केलेलेच आडवे आले

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : आमदार होण्यासाठी आम्ही ज्यांना मदत केली त्यांनीच आमच्या ताब्यातील कारखान्याची सत्ता काढून घेण्यासाठी थेट व टोकाचा प्रयत्न केला. यापुढे अशा नेत्यांना जवळ करणार नसून, आगामी विधानसभा निवडणूक आम्ही लढणारच असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी गर्जना नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली.

तालुक्यातील पिंपळगावपिसे येथील सेवा संस्थेचे अध्यक्ष बंडू पंधरकर यांची नुकतीच नागवडे कारखान्याच्या स्विकृत संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या सभेत नागवडे म्हणाले, स्वर्गीय बापुंच्या संस्कारावर आमची राजकीय व सामाजिक पायाभरणी आहे. त्यांच्या विचारातून समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न करतोय.

यापुर्वी तालुक्याचा विकासाला प्राधान्य देवून निवडणुकीत थांबण्याचे धोरण घेतले. इतरांना संधी मिळाली तरी चालेल मात्र राजकारणाचा वेगळा पायंडा पडू नये याची दक्षता घेतली. मात्र ज्यांना आमदार होण्यासाठी मदत केली, त्यांनीच आमची कारखान्यातील सत्ता काढून घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यात कुणी उघडपणे आमच्या विरुध्द होते तर कुणी छुप्या पध्दतीने आमचे राजकारण संपविण्याची चाल खेळत होते. आता अशा लोकांना यापुढे मदत करणार नाही, असे नागवडे म्हणाले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सुभाष शिर्के, सुदाम जठार, रामदास झेंडे, महेश टकले, रामदास कानगुडे, विजय जठार, सुलोचना पाडळे, बाबुराव ढगे, सुरेश बांदल, अनिल ढवळे, तात्यासाहेब जठार उपस्थित होते.पिंपळगाव पिसा हे माजी आमदार राहुल जगताप यांचे गाव आहे. तेथे जाऊन नागवडे यांनी केलेली आमदारकी लढण्याची घोषणा म्हणजे भविष्यात नागवडे-जगताप यांची युती तुटल्याचे संकेत आहेत.

कार्यकर्ते तयारीला लागले : नागवडे

नागवडे म्हणाले, यापुर्वी थांबलो मात्र यावेळी थांबणार नाही. आगामी आमदारकी नुसती लढणारच नाही तर कार्यकर्त्यांच्या जीवावर ती जिंकणारही आहोत. त्यासाठी नागवडे कुटूंबातील उमेदवार हा प्रत्येकाच्या मनातील असेल. कुकडीचे पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु असून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना भेटणार आहोत. या भागातील रस्ते, वीज यासोबतच इतर प्रश्नांसाठी कायम लढा देत असून समस्यांबाबत थेट संपर्क करण्याचे आवाहनही नागवडे यांनी केले. बंडू पंधरकर यांनी, यापुढचे राजकारण हे नागवडे कुटूंबासोबतच करणार असून तालुक्याचे आमदार नागवडे व्हावेत यासाठी आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते तयारीला लागले असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT