Pistol sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी घोडेगाव (ता. नेवासे) येथे घेऊन आलेला आरोपी सचिन वसंतराव कोळेकर (रा. मुक्तापूर, ता. नेवासे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी (ता. ३१) सापळा लावून जेरबंद केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. सचिन वसंतराव कोळेकर (रा. मुक्तापूर, ता. नेवासे) हा एक गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने घोडेगावला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात येणार असल्याच्या या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, हवालदार मनोहर गोसावी, संदीप घोडके, लक्ष्मण खोकले, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने, रोहित येमूल, बबन बेरड यांच्या पथकाने दोन पंचांसह खासगी वाहनाने घोडेगावला जाऊन सापळा लावला.

या ठिकाणी संशयित आरोपी आला असता त्यास पोलिस पथकाने घेराव घालून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तोल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. पोलिस नाईक ज्ञानेश्‍वर नामदेव शिंदे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कोळेकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध दरोडा, घातक शस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापत करणे असे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

SCROLL FOR NEXT