विशाल फटेविरुध्द 129 तक्रारी! मालमत्ता विकून दिली जाणार गुंतवणूकदारांची रक्‍कम

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास कमी कालावधीत जादा पैसे मिळतील आमिष विशालने गुंतवणूकदारांना दाखविले
Vishal Fate
Vishal Fatesakal

सोलापूर : सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच जादा पैसे मिळतील, या आमिषातून अनेकांनी विशाल फटे याच्याकडे पैसे गुंतवले. मात्र, आतापर्यंत 129 जणांचे जवळपास 25 कोटी रुपये अडकून पडले आहेत. त्यांना त्यांची रक्‍कम परत देण्याच्या दृष्टीने पोलिसांनी युध्दपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे.

Vishal Fate
लसीकरणाने मिळाला अर्थव्यवस्थेला बूस्टर

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास कमी कालावधीत जादा पैसे मिळतील, असे आमिष विशालने गुंतवणूकदारांना दाखविले. सुरवातीला विश्‍वास पटेपर्यंत काहींना पैसे परतही दिले. मात्र, गुंतवणूकदारांच्याच पैशातून त्याने स्वत:साठी 45 लाखांची चारचाकी घेतली. बार्शीत प्रत्येकी तीन कोटींची दोन घरे बांधली. गुंतवणूकदारांना वेळेत पैसे परत देत नसल्याने त्यांनी विशालच्या ऑफिसचा दरवाजा ठोठवायला सुरवात केली. परंतु, जवळ पैसे नाहीत आणि गुंतवणूकदारांचा तगादा पाहून तो पसार झाला. त्यानंतर तो स्वत:हून पोलिसांत हजर झाला. तो उद्यापर्यंत (मंगळवार) पोलिस कोठडीत आहे. आतापर्यंत पोलिसांनी त्याचे संगणक जप्त केले असून लॅपटॉप व मोबाइल्स फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत.

Vishal Fate
‘डब्लूएचओ’कडून चुकीचा नकाशा प्रसिद्ध

त्याच्या व्यवहाराचे लेखापरीक्षण सुरू असून चार्टर्ड अकांउंटकडून त्याचा लवकरच अहवाल पोलिसांना मिळणार आहे. त्यातून विशालने गुंतवणूकदारांची रक्‍कम नेमकी कुठे गुंतवली, हे समोर येणार आहे. दरम्यान, मंगळवेढ्यात त्याचे जुने घर असून वडिलांच्या नावावर पाच- सहा एकर शेतजमीन आहे. तत्पूर्वी, बार्शी मुख्याध्याधिकारी व तहसिलदारांना पोलिसांनी पत्र देऊन फटे व त्याच्या कुटुंबियांच्या नावावरील मालमत्तांची माहिती मागविली आहे. दरम्यान, त्याच्या भावाने जवळपास 15 तोळे सोने (5.34 लाख किंमत) स्वत:हून पोलिसांत जमा केले आहे. त्याच्या संपूर्ण मालमत्तांचे मूल्यांकन झाल्यावर गुंतवणूकदारांची यादी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सादर केली जाणार आहे.

Vishal Fate
देशात रुग्णसंख्येत मोठी घट; १.६७ लाख नवे रुग्ण

"एसआयटी'तर्फे (विशेष तपास पथक) विशाल फटे याचे व्यवहार पडताळणी सुरू आहे. बार्शी आणि मंगळवेढ्यात त्याची मालमत्ता असून त्यासंबंधीची माहिती तहसिलदारांकडून मागविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून गुंतवणूकदारांची यादीही दिली जाईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधितांना रक्‍कम परत मिळेल.

- संजय बोथे, पोलिस उपअधीक्षक, अर्थ, सोलापूर ग्रामीण

घर, शेतीवर कर्ज अन्‌ दागिने मोडून गुंतवणूक

जादा पैशांच्या अमिषातून सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील 129 जणांनी विशाल फटे याच्याकडे पैसे गुंतवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. 24 कोटी 99 लाख 11 हजार 500 रुपयांची गुंतवणूक त्यांनी फटे याच्याकडे केली. बहुतेक जणांनी त्यांच्या घरावर, शेतीवर कर्ज काढून तर काहींनी दागिने मोडून पैसे गुंतविले आहेत. त्यांचे पैसे परत देण्याच्या दृष्टीने विशाल फटे व त्याच्या वडिलांच्या नावावरील जागा, जमीन ताब्यात घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com