Breaking News: Two and a half hundred artillery shells found in Kharda fort 
अहिल्यानगर

Breaking News : खर्ड्याच्या किल्ल्यात सापडले २५० तोफगोळे, मोठा इतिहास उलगडणार

वसंत सानप

खर्डा (ता.जामखेड) : येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात उत्खननादरम्यान मराठेशाहीचा "खजिना" सापडला आहे. मराठे आणि निजाम यांच्यात लढाई झाली होती. या लढाईत मराठ्यांनी विजय मिळवला होता. हा मराठ्यांचा शेवटचा विजय समजला जातो. हा किल्ला त्या घटनेचा साक्षीदार आहे. हा ऐवज सापडल्याने आणखी काय काय आढळून येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या ऐवजामुळे इतिहासाच्या पानात डोकावता येणार आहे. 

ही बातमी इतिहास प्रेमींना समजताच किल्ल्याच्या दिशेने सर्वांचेच पाय वळाले. या संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देऊन हा ऐवज तपासावा आणि ताब्यात घ्यावे व जतन करावे अशी मागणी होत आहे.

खर्डा (ता.जामखेड)येथे 1745 साली सुल्तानराजे निंबाळकर यांनी खर्डा येथे भुईकोट किल्ला बांधला आहे. ते शिवभक्त म्हणून परिचित आहेत. त्यांनी खर्डा परिसरात बारा ज्योतिर्लिंग उभारली आहेत. सन 1795 ला येथे मराठ्यांशी निजामशाही अखेरची लढाई झाली. या लढाईत निजमांचा पराभव झाला. या लढाईत मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात तोफगोळ्यांचा वापर केला होता, अशी इतिहासात नोंद आढळते. 

मात्र, गेली पंचवीस वर्षांपासून हा किल्ला अस्तित्वासाठी 'झुंज' देत होता. अखेरची विजयी लढाई येथे झाल्याने इतिहासप्रेमींच्या सतर्कतेमुळे पुरातत्व विभागाने लक्ष केंद्रित केले.

हा किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने किल्ला दुरुस्ती, सुशोभीकरण व अन्य अनुषंगिक कामासाठी आर्थिक तरतूद केली. येथे किल्ल्याच्या अंतर्गत भिंत्तीच्या लगत उत्खननाचे काम सुरू आहे. हे काम करणाऱ्या कामगारांना अडीचशे तोफगोळे सापडले आहेत. किल्याच्या तटबंदीच्या शेजारी जवळपास तीन प्रकारचे तोफगोळे मिळाले आहेत.

उत्खनना दरम्यान मिळालेला हा ऐतिहासिक वारसा जपला जावा; तसेच यापुढे येथील उत्खनन अथवा अनुषंगिक काम करताना आढळणाऱ्या सर्व ऐतिहासिक अवशेषांचे जतन करावी अशी इतिहास प्रेमींकडून मागणी होत आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT