esakal | पवारांचे नातू असूनही रोहित यांचे पाय जमिनीवरच
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar has no ego

मंत्री देसाई म्हणाले, ""कर्जतहून जामखेडपर्यंत येताना आमदार रोहित पवारांनी विकासकामांचा "रोड मॅप' मांडला. विविध खात्यांच्या मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना भेटून ते पाठपुरावा करतात.

पवारांचे नातू असूनही रोहित यांचे पाय जमिनीवरच

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : पोलिस कुटुंबीयांसाठी वसाहती उभारण्यासाठी राज्य शासनाने 375 कोटींची तरतूद केली होती. कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतर, राज्यातील चार-पाच पोलिस वसाहतींच्या प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दिला. त्यात आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत-जामखेडचा समावेश झाला.

शरद पवार यांचे नातू म्हणून रुबाब न मिरवता, आमदार रोहित पवार यांचे पाय जमिनीवर आहेत, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. 

पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थाने उभारण्याच्या कामाचा प्रारंभ मंत्री देसाई यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार रोहित पवार, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, दीपाली माइक, अण्णासाहेब जाधव, संभाजी गायकवाड, विशाल नाईकवाडे आदींसह प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वारे, सूर्यकांत मोरे, सुनील लोंढे, रमेश आजबे, लक्ष्मण ढेपे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - राहुरी कृषी विद्यापीठात बाहेरचेच होणार कुलगुरू

मंत्री देसाई म्हणाले, ""कर्जतहून जामखेडपर्यंत येताना आमदार रोहित पवारांनी विकासकामांचा "रोड मॅप' मांडला. विविध खात्यांच्या मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना भेटून ते पाठपुरावा करतात. त्यामुळे येथील विकासकामे मार्गी लागतील.'' रोहित पवार म्हणाले, की जामखेडसाठी मंजूर असलेले पोलिस प्रशिक्षण केंद्र अन्यत्र गेले होते. मात्र, आम्ही ते परत आणले. त्यामुळे 1000 पोलिस येथे प्रशिक्षणासाठी राहणार आहेत. हा प्रस्ताव मंत्रालयात अंतिम टप्प्यात आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करावी.'' 

नेटके नियोजन 
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी या कार्यक्रमासाठी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व इतरांचे सहकार्य घेऊन पोलिस ठाण्याचा परिसर देखणा केला. त्यांनी केलेल्या नेटक्‍या व्यवस्थापनामुळे हा कार्यक्रम अतिशय देखणा झाला. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image