Comfortable ... Coronamukta's peak, today in the city, 126 people won over Corona 
अहिल्यानगर

दिलासादायक... कोरोनामुक्तांचा उच्चांक, आज नगरमध्ये तब्बल 126 जणांचा कोरोनावर विजय 

विनायक लांडे

नगर ः शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येने भलताच वेग घेतला असला, तरी कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांच्या संख्येतही कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. आज कोरोनामुक्तांच्या संख्येने उच्चांक गाठला. जिल्ह्यात तब्बल 126 जण कोरोनावर मात मिळवून घरी परतले आहे. ही बाब जिल्हावासियांसाठी दिलासादायक ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 920वर पोचली आहे. 

कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज शंभरहून अधिक रुग्णांची भर पडताना दिसत आहे. त्यामुळे नगरकरांची झोप उडाली असून प्रसासनाचीही चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आजअखेर कोरोनाबाधितांचा आकडा 1439वर पोचला आहे. दुसरीकडे नगरमध्ये कोरोनावर मात करून बरे होण्याचे प्रमाणही अन्य जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांचे यात मोलाचे योगदान आहे. योग्य उपचार व रुग्णांची घेतलेली काळजी ही जमेची बाजू आहे. दोन वर्षांच्या बाळासह 90 वर्षांच्या वृद्धांनीही कोरोनावर मात मिळवून आपणही कोरोनाला हरवू शकतो, हे दाखवून दिले आहे. आज एकाच वेळी 126 जणांना डिस्चार्ज मिळाला. हे प्रमाण यापूर्वीपेक्षा सर्वांधिक आहे. कधी नव्हे, तो आज इतक्‍या मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांनी मात मिळवली. नगर शहर 79, संगमनेर 17, श्रीगोंदे दहा, राहाता सात, नगर तालुका, पारनेर प्रत्येकी तीन, जामखेड, नेवासे, श्रीरामपूर प्रत्येकी दोन, शेवगाव एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा रद्द! आरोपी, तक्रारदार तरुणीत प्रेमाचे नाते, न्यायालयाचे निरीक्षण

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

CSK vs SRH Live: संजू सॅमसन 'फसला', उर्विल पटेलचा आडवा फटका हुकला... पॅट कमिन्सच्या डावपेचांनी चेन्नईला 'पॉवर' दाखवली... Video

SCROLL FOR NEXT