Corona crisis worsens in town ... 54 more new patients added 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोनाचे संकट अधिक गडद...आणखी 54 नव्या रुग्णांची भर 

विनायक लांडे

नगर : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने संकट अधिक गडद झाले आहे. आज आणखी 54 जणांना बाधा झाली असून 132 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 1493वर पोचली आहे. 

शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गेल्या काही दिवसांपासून शंभरी पार करायला सुरवात केली. उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे आवाहनही फेल होताना दिसत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. अन्यथा परिस्थिती अधिक धोकादायक होण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नगर शहरात दहा रुग्णांची भर पडली. त्यात मार्केट यार्ड तीन, नालेगाव, केडगाव, भिस्तबाग चौक, सुडके मळा, रेल्वे स्टेशन, रंगार गल्ली, बागडपट्टी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय श्रीरामपूर शहर दोन, बेलापूर, शिरसगाव प्रत्येकी एक बाधित आढळला आहे. कर्जत शहर, माही जळगाव प्रत्येकी एक, अकोले शहर तीन, लहीत येथे एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जामखेड तालुक्‍यातील सोनेगाव, साकत येथे प्रत्येकी एक, तर 
नगर तालुक्‍यातील निंबळक, घोसपुरी, निमगाव घाणा येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह आढळला. तसेच पाथर्डी एक, शेवगाव शहर पाच, मुंगी पाच, नेवासे तालुक्‍यातील सोनई तीन, पारनेर तालुक्‍यातील लोणी मावळा तीन, पिंपळगाव रोठा दोन, कर्जुले हर्या, कुंभारवाडी, वडनेर बुद्रूक, खडकवाडी येथे प्रत्येकी एकाला बाधा झाली. याशिवाय संगमनेर तालुक्‍यातील गुंजाळवाडी तीन, कुरण येथे तिघे पॉझिटिव्ह आढळले आहे. सध्या 540 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT