मंत्री शंकरराव गडाख क्वारंटाईन, पत्नी सुनीताताईंना कोरोनाची बाधा....समर्थकांकडून प्रकृतीस्वास्थ्यासाठी प्रार्थना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

इतर तपासणीच्या निमित्ताने गडाख रुग्णालयात होत्या. रुग्णालयातील काम अटोपून घरी जाताना खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी चाचणीसाठी स्राव दिला होता.

नेवासा-सोनई : नेवासे पंचायत समितीच्या माजी सभापती व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सोनईकर अधिकच अस्वस्थ झाले आहेत.

इतर तपासणीच्या निमित्ताने गडाख रुग्णालयात होत्या. रुग्णालयातील काम अटोपून घरी जाताना खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी चाचणीसाठी स्राव दिला होता. शुक्रवारी (ता.१७) रोजी त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. 

हेही वाचा - बारस्करांनी कळमकरांची केली पोलखोल

आज मंत्री गडाखांनी तातडीने आपला स्राव तपासणीसाठी देवून नगर येथील बंगल्यावर होम काॅरंटाईन झाले आहेत. त्यांचा अहवाल आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे. पत्नीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे मंत्री गडाख यांनी ट्विट करुन माहिती दिली.

सध्या सोनई गाव हाॅटस्पाॅट अाहे. येथे आज सकाळी तीन जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने एकूण पाॅझिटिव्ह रुग्णाची संख्या बावीस झाली आहे.

 

गावातील संख्या रोज वाढत असताना गडाख पाॅझिटिव्ह असल्याची बातमी आल्याने ग्रामस्थांची धाकधूक अधिकच वाढली आहे. सुनीताताई गडाख यातून लवकर बाहेर पडो, अशी देवाला प्रार्थना कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. सोशल मीडियावर तशा पोस्ट टाकल्या जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Gadakh Quarantine, wife Sunitatai Corona positive