Corona-infected woman from Mumbai in Shrigonde 
अहिल्यानगर

श्रीगोंद्यात आला बघा मुंबईचा वानवळा 

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : मुंबईतील मुलीकडे राहत असलेल्या 85 वर्षीय वृद्ध महिलेला मुलीने मूळ गावी कोंडेगव्हाण येथे आणून सोडले होते. ती वृद्धा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आज आल्याने, श्रीगोंदेकरांना पुन्हा मुंबईहून कोरोनाचा वानवळा मिळाला. 

कोंडेगव्हाण येथील या आजीमुळे श्रीगोंद्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तीन झाला आहे. श्रीगोंदे फॅक्‍टरी येथील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्या होत्या. याआधी दहा महिन्यांचे मूल आणि आज 85 वर्षांची आजी, अशा सर्वांत कमी आणि सर्वांत जास्त वयाच्या व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची नोंद तालुक्‍यात झाली. 

तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले, ""त्या आजीच्या घरच्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजीचा एक मुलगा कोंडेगव्हाण येथे आहे, तर दुसरा मुंबईत पोलिस आहे. आजी त्यांच्या मुंबईतील मुलीकडे होत्या. मुलगी व जावयाने आजीला 27 मे रोजी कोंडेगव्हाणला आणून सोडले. नंतर त्रास होऊ लागल्याने 31 मे रोजी श्रीगोंद्यात क्वारंटाईन करून त्यांचा स्राव नगरला पाठविला होता. तो आज पॉझिटिव्ह आला. कोंडेगव्हाणच्या हद्दी "सील' केल्या असून, तेथील 185 कुटुंबांची आरोग्यतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिलेच्या घरातील चौघांचीही तपासणी करण्यात येणार आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT